पुणे येरवडा मध्यवर्ती कारागृह अधिकारी-कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर स्वराज्य पॅनलची सत्ता ! विद्यमान चेअरमन बाजीराव पाटील पॅनलचा दारुण पराभव
येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृह अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीमध्ये स्वराज्य पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत विद्यमान चेअरमन बाजीराव पाटील यांच्या पॅनलचा अक्षरशा धुवा उडवत एक हाती सत्ता मिळवली. विद्यमान चेअरमन बाजीराव पाटील यांची नियोजनातील ढिलाई पॅनेलला पराभवाच्या खाईत लोटणारी ठरली, स्वराज्य पॅनलच्या उमेदवारांनी परिवर्तन घडवण्याच्या इराद्याने प्रचार यंत्रणा राबवली होती, झालेल्या एकूण मतदानापैकी 90% इतके मतदान झाल्याने सभासद कोणाला कौल देणार याविषयी मोठी उत्कंठा वाढली होती.
• सर्वसाधारण प्रतिनिधी.
विजय उमेदवार
1) मनोज गायकवाड
2) वसीम इनामदार
3) अतुल पटेकर
4) प्रमोद इंगळे
5) योगेश पाटील
6) भरत बंडगर
7) प्रमोद जानराव
8) दौलत खिल्लारे
• अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी.
9) साहेबराव वाळकुळे
• महिला राखीव प्रतिनिधी.
10) प्रणाली कोकाटे
11) लीला धुमाळ
• सर्वात तरुण उमेदवार म्हणून भोर तालुक्यातील संगमनेर गावचे सुपुत्र मनोज गायकवाड ठरले असून ते सर्वाधिक मतांनी महाराष्ट्रातून 1 नंबर ने निवडून आले असुन एकूण मताच्या 84% मतदान त्यांना झाले विद्यमान चेअरमन बाजीराव पाटील पॅनलचे सर्व उमेदवार व अपक्ष उमेदवारांना पराभूत पत्करावा लागला. यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून अमर देशपांडे यांनी काम पाहिले .
यावेळी संचालक पदी सर्वाधिक मतांनी निवडून आलेले तरुण उमेदवार मनोज गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून सांगण्यात आले की ही निवडणूक इतर राजकीय स्वरूपाची नव्हती मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढलो आहोत, सर्व उमेदवार हे येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे कर्तव्यावर आहेत, ही पतसंस्था अजून पुढे नेण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे, विद्यमान चेअरमन बाजीराव पाटील यांनी देखील छान कार्यभार सांभाळला आहे ते यामध्ये संचालक म्हणून गेली 10 वर्ष काम पाहत असून 1 वर्षापासून ते चेअरमन आहेत तसेच व्हा. चेअरमन रवींद्र सावंत तर सचिव अमर पाटील यांनी देखील स्वराज्य पॅनल चे उमेदवार यांना निवडून आल्यावर शुभेच्या दिल्या आहेत.म्हणून आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले . तसेच आम्ही सर्वजण DIG (मॅडम) मा.स्वाती साठे सो, अधीक्षक मा. सुनील ढमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कामकाज हे प्रथम ड्युटीकर्तव्य बजावत पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




