ताज्या घडामोडी

तांबाड गावात महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड ! तांब्याच्या तारांसह चोरटे पसार


नसरापूर : तालुक्यातील तांबाड गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी करत मोठे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे तांबाड येथील भरत पर्वती सोनकर यांच्या मालकीच्या जमिनीवरील मोकळ्या जागेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा 4058058 कोड असलेला 63 के.व्ही. क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. दिनांक 19 जुलै रोजी पहाटे 2 ते दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यामधील सुमारे 35 किलो वजनाच्या तांब्याच्या तारांची चोरी केली.

Advertisement

चोरी केलेल्या तांब्याच्या तारांची अंदाजे किंमत 17 हजार 500 रुपये असून, चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल सांडून त्याचेही नुकसान केले आहे. या घटनेमुळे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील वीज यंत्रणेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी संतोश रामदास नाईलकर यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार तळपे करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!