छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वरच्या शिव मंदिरात मनोज जरांगे पाटलांचा अभिषेक : पवित्र भूमीत आरक्षणाचा नवा संकल्प
भोर : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या पवित्र शिवमंदिरात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अभिषेक करून विधिवत पूजा केली. रायरेश्वर म्हणजे 33 कोटी देवांचे ठिकाण असून या ठिकाणी आल्यानंतर भयंकर शक्ती मिळते,आरक्षणासाठी नवा संकल्प करण्यात आला.
रायरेश्वर किल्ल्याच्या विकासाबाबत ते म्हणाले, किल्ल्याचा म्हणावा असा विकास झालेला नाही, यासाठी मी सरकार मधील सर्व नेत्यांशी बोलणार आहे. आता मी रायरेश्वरच्या विकासाच्या मागे लागलो आहे, रामेश्वरला चढताना जो लोखंडी जिना आहे त्याठिकाणी सिमेंटच्या पायऱ्या करणे आहे, मी आता विकासाच्या मार्गाला लागलो आहे.
आरक्षणा बाबत ठाम भूमिका मांडताना 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आरक्षणा संदर्भात आंदोलन होणारा असुन मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल होणार आहे, यावेळी गुलाल उधळणार आणि ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आहे आता सर्व मराठ्यांनी ठरवले आहे.




