ताज्या घडामोडी

चिंचवडमध्ये सततच्या चारित्र्य संशयातून पत्नीकडून पतीचा गळा आवळून खून


संतोष आडसुळ,
उपसंपादक.

पिंपरी-चिंचवड : दि.२४ (ऑक्टो.) शुक्रवार चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चैताली भोईर असे आरोपी पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात चैतालीने कापडाने नकुलचा गळा आवळून त्याचा खून केला. या घटनेनंतर चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चैताली भोईर हिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

नकुल भोईर सामाजिक क्षेत्रात अत्यंत सक्रीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. मराठा क्रांती मोर्चा आणि विविध सामाजिक संघटनांच्या उपक्रमांमध्ये त्यांचा जिव्हाळ्याचा सहभाग होता. त्यांचे अनेक राजकीय नेत्यांशी देखील घनिष्ठ संबंध होते. सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी नकुल यांनी आपल्या पत्नीला नगरसेवक पदासाठी आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे करायचे ठरवले होते.

परंतु चारित्र्याच्या संशयामुळे उद्भवलेल्या या वादातून कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. या विवाहित दाम्पत्यामागे दोन लहान मुले पोरकी झाली आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!