उंबरे गावात विकासकामांना गती ! जिल्हा परिषद शाळा ते आबुराव बाबुराव रोड काँक्रीटीकरणास सुरुवात
उंबरे : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उंबरे ग्रामपंचायतीतील जिल्हा परिषद शाळा ते आबुराव बाबुराव रोड दरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. या विकासकामासाठी 10 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून गावाच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, भोर-राजगड-मुळशीचे युवा नेते कुलदीप कोंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, तसेच शिवसेना पदाधिकारी विशाल खुटवड आणि रमेश खुटवड यांची उपस्थिती होती.
उंबरे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच गणेश खुटवड, उपसरपंच गंगा खुटवड, सदस्य बाळासाहेब खुटवड, वैशाली खुटवड, किशोरी खुडे, रामचंद्र खुटवड, नंदा पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमात नवनियुक्त चेअरमन अरुण आबा खुटवड यांचा सत्कारही करण्यात आला.
तसेच कार्यक्रमास गावातील तरुण वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यामध्ये भैरवनाथ तरुण मंडळ अध्यक्ष सुरज खुटवड, उल्हास खुटवड, सुयश खुटवड, अनिकेत देवकर, आदित्य देवखुटवड, आकाश खुटवड, गोटू खुटवड, सोहम खुटवड, अक्षय खुटवड आदी उपस्थित होते.
रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून या उपक्रमामुळे उंबरे ग्रामविकासाचा मार्ग अधिक सक्षम होईल.




