ताज्या घडामोडी

कापुरव्होळ स्मशानभूमीला काँक्रीटची नवी झळाळी ! विक्रमदादा खुटवड यांच्या हस्ते १०.५० लाखाच्या कामाचे भूमिपूजन


कापूरहोळ : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) विशेष प्रयत्नाने कापुरव्होळ गावातील स्मशानभूमीचे काँक्रीटीकरण व सुधारणा करणारे महत्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (पालकमंत्री पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार शंकरभाऊ मांडेकर (भोर-राजगड-मुळशी विधानसभा) व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रमदादा खुटवड यांच्या विशेष पुढाकाराने या कामाकरिता १०:५० लाख रुपये मंजूर करण्यात आले असुन आज या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भोर-राजगड-मुळशीचे युवा नेते विक्रमदादा खुटवड यांच्या शुभहस्ते पार पडला.

Advertisement

लेखाशीर्ष २५१५-१५०५-३१ अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधांसाठी कापूरहोळ गावच्या स्मशानभूमी करिता१०.५० लाख रुपयांचा निधी खर्च होणार असून, या कामाकरिता केतकेश्वर सहकारी मजूर संस्थेची निवड झाली आहे. या कामामुळे स्मशानभूमी अधिक सुब्कर, सुरक्षित होईल, ज्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल.

सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थांनी या विकास कामाबद्दल आनंद व्यक्त केला असून, गावाच्या प्रगतीत नेत्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे स्थानिक लोकांना दर्जेदार जनसुविधा मिळणार आहे.

यावेळी कार्यक्रमास विशाल (बंटी) कोंडे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष भोर तालुका, नथुराम गायकवाड मा सरपंच, सचिन सोंडकर उपसरपंच तांभाड, योगेश शेलार , सुशांत सोंडकर उद्योग अघाडी अध्यक्ष, नवनाथ कोंडे, पराग कोंडे तसेच ग्रामस्थ मंडळ, महिला भगिनी, युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!