आंबेगाव : माळीण येथील दुर्दैवी घटनेला 10 वर्षे पूर्ण
अनिल रणपिसे, प्रतिनिधी…
आंबेगाव : दि. 30/7/24 ( मंगळवार ) पुणे जिल्हा,आंबेगाव तालुक्यातील माळीण येथील दुर्दैवी घटनेला 10 वर्ष पूर्ण झाली. माळीण येथे 30 जुलै 2014 रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या दुर्घटनेत 44 कुटुंबातील 151 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता,या दुर्दैवी घटनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली. या दुर्घटनेतील निष्पाप जीवांच्या पवित्र स्मृतींना आज स्मृतिस्तंभ येथे पुर्वाताई वळसे पाटील यांनी आदरांजली वाहिली.
तसेच शाळेमधील विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शासनाकडुन पाठयपुस्तके मोफत मिळत असतात,परंतु त्या व्यतिरिक्त लागणारे इतर शैक्षणिक साहित्य उदा. दप्तर, बुट, सॉक्स, पीटी बुट, कंपास पेटी, फुट पट्टी, वह्या, स्वाध्यायमाला, प्रात्याक्षिक पुस्तिका, चित्रकला वही, नकाशा पुस्तिका, रेनकोट, स्टीलची पाण्याची बॉटल आदी साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, आंबेगाव जुन्नर उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला वाळुंज, माजी सभापती प्रकाशराव घोलप, संजय गवारी, अमोल अंकुश, झांझरे गुरुजी, सखाराम विरणक गुरुजी, दिपक विरनक, माळीण गावचे सरपंच रघुनाथ झांझरे, अडिवरे गावच्या सरपंच संगिता किर्वे, राजेंद्र थोरात, निलेश बोऱ्हाडे यांच्यासह माळीण व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.




