सामाजिक

करंदी खे.बा.रस्त्यावर ! काय ते पाणी, काय ते खड्डे, अन् काय तो चिखल, प्रशासन कसं ओकेमध्ये !! विलासबापु बोरगे


नसरापूर : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील करंदी खे.बा.  गावचा रस्ता पाण्यात अक्षरशः वाहून गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातील करंदी गावच्या रोडवर मोठे खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

पुणे-बेंगलोर महामार्ग ते करंदी गावचे अंतर ४ किलोमीटर असुन  सध्या हा रस्ता पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त खराब रस्ता म्हणून ओळखला जातोय वारंवार शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय लोकांची निवेदन देऊन त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून आज रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये करंदी विलास बोरगे व ग्रामस्थांच्या वतीने ब्राह्मणांच्या उपस्थितीत रस्त्याचा अभिषेक करण्यात आला.

Advertisement

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विलासबापु बोरगे यांनी सांगितले की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपले फिरणं होत असते, परंतु आपण एवढ्या गलिच्छ प्रकारचा, घाणेरडे रस्ता कोठेच पाहिलेला नसेल आमच्या सारखे नॅशनल हायवे पासून फक्त ५ मिनिटाच्या अंतरावर असलेले गावाला न्याय मिळत नाही हे खऱ्या अर्थाने या लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे. या ठिकाणच्या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधापासुन वंचित राहावे लागते आहे, आजारी व्यक्ती हॉस्पिटलला नेताना रस्त्याने जातांना भरपूर प्रमाणात त्रास होत असतो, एखादी गर्भवती महिला भगिनी असेल तर तिला हॉस्पिटलमध्ये नेताना मोठी कसरत करावी लागते, या खराब रस्त्यामुळे गावातील काही युवकांची लग्न ही मोडले गेलेली आहेत, जर गावामध्ये कोणतं सुख-दुःखाचे कार्य असले तर पाहुणे सुद्धा येण्याकरीता टाळाटाळ करतात कारण फक्त आणि फक्त रस्ताच आहे, प्रशासनाकडून आमचे गाव दुर्लक्षित होत आहे.  प्रशासनाच्याने  किंवा राजकीय नेत्यांनी जर याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात निवडणुकीसाठी आमच्या गावाच्या घरांचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद असतील.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!