नसरपुर-राजगड (वेल्हा) रस्त्याची चाळण ! मनसे कडून खड्यात झाडे लावून प्रशासनाचा निषेध
नसरपुर : चेलाडी (नसरापुर) ते राजगड (वेल्हा) रस्त्याची चाळण झाल्याने आणि याकडे संबंधित यंत्रणा लक्ष देत नसल्याचे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून रस्त्यावर पाणी साचलेल्या जागेवर रविवारी (दि.३१ ऑगस्ट) झाडे लावून रोष व्यक्त केला.
मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने राजगड तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन रस्त्याची अक्षरशा चाळण झाल्यामुळे खड्यात रस्ता की रस्त्यावर खडे समजणे कठीण झाले आहे. वाहनधारकांना आपले वाहन रस्त्याने चालविणे जिकिरीचे झाले आहे. नसरापूर ते राजगड तालुक्याच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे मनसेने प्रशासनाला निवेदन दिले होते, रस्त्यावरील खडे बुजवून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल असे वाटत होते,परंतु प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले त्यांना नागरिकांच्या समस्या बाबत काहीच फरक पडत नसल्याने रविवारी दि.३१ रोजी रस्त्यावरील खड्यात साचलेल्या पाण्यात झाडे लावून संबंधीत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
आपल्या भाषणामध्ये अडवली येथील खड्ड्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची आठवण करून देत वारंवार अपघात होत असून प्रशासन गप्प का असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला, अजित पवारांनी विधानसभे वेळी मतदार संघामध्ये शंभर कोटी नव्हे तर पाच हजार कोटी देण्याची गव्हाई दिली होती प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही वारंवार प्रशासनाला तक्रार करून ही अधिकारी,आमदार,खासदार,कशाशी देणे घेणे नसल्याचे संतोषआप्पा दसवडकर यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोषआप्पा दसवडकर, विलास बोरगे, दिगंबर चौरगे, धनंजय टेंमघरे, शशिकांत वाघ, अशोक चोरगे, संतोष चोरगे, मिथुन चोरगे, संग्राम दसवडकर, पांडुरंग पिलाने यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राजगड तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते.




