ताज्या घडामोडी

हिंगेवाठार गावच्या ४० वर्षाचा रस्त्याचा वाद संपुष्टात : भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांची कौतुकास्पद कामगिरी


कापूरहोळ : भोर तालुक्यातील हिगेवाठार गावातील ४० वर्षा पूर्वीचा रस्त्याच्या वाद गावचे प्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थांशी चर्चा करून तहसीलदार राजेंद्र नजर यांनी सामोपचाराने मिटवून रस्ता सर्वानसाठी खुला करून दिला आहे.

शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाण्यासाठी तसेच गावच्या पाणीपुरवठा विहिरीकडे जाण्यासाठी हा वादग्रस्त रस्ताच एकमेव  पर्याय होता ४० वर्षापासून ग्रामस्थांसह परिसरातील शेतकऱ्यांना जाण्या- येण्यासाठी मोठी गैरसोय होत असल्याने रस्त्याच्या वाद मिटल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement

तहसीलदार राजेंद्र नजर यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन रस्ता हा गावाच्या विकासासाठी आणि सर्वांच्या सोयीसाठी किती महत्त्वाचा आहे, हे सर्व ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पटवून दिले, अखेर सर्वानुमते हा रस्ता सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४० वर्षापूर्वीचा वाद मिटवल्यामुळे भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांचे हिगेवाठार ग्रामस्थानकडून कौतुक केले जात आहे.

यावेळी मंडलाधिकारी पांडुरंग लहारे, तलाठी राहुल गायकवाड, पोलीस पाटील सिकंदर हिंगे, दिनकर शिवणकर, कुंदन हिंगे,गणेश हिंगे,सचिन कदम, दिलीप शिवणकर, बबन हिंगे,ज्ञानेश्वर शिवणकर रमेश हिंगे आणि आनंता हिंगे यांच्यासह गावातील अनेक प्रमुख व्यक्ती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!