छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित छावाची पहिल्याच दिवशी बंपर कमाई
छावा या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असून रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईची भूमिका साकारत आहे, हा चित्रपट शुक्रवार 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असुन पहील्याच दिवशी चित्रपटाने तब्बल 20 कोटी रुपये कमवले असुन कमाई बाबत 7 चित्रपटांना मागे टाकले आहे.
या वर्षीच्या सुरुवातीला इमर्जन्सी, आझाद, स्काय फोर्स, देवा, लव्हयापा, बँडएस रवीकुमार या सात चित्रपटांना छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.
छावा चित्रपटातील वादग्रस्त लेझीम सिक्वेन्स काढून टाकला असून काही शब्द बदलण्यापासून ते इतिहासाला अपमानित करणारे दृश्य काढून टाकण्यात आले आहे सेंसर बोर्डाने कोणताही वाद निर्माण होऊ नये याची काळजी घेत कोणतीही कसर सोडली नसून बॉलीवूड हंगामाच्या या चित्रपटाला सीबीएफसीने यु /ए 16+ प्रमाणपत्र दिले आहे.
‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेता अक्षय खन्ना देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसला आहे. हा चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट असणार आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्याच्या माध्यमातून जगभरात पोहोचवणार आहे. 1681 मध्ये राज्याभिषेकापासून सुरू झालेल्या शूर मराठा राजाच्या गौरवशाली इतिहासाला जगभरात पोहोचवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.



