क्राईम

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या 9 व्या स्नेहसंमेलनात दिसली महाराष्ट्राची संस्कृती


किकवी : ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी ता. भोर जि. पुणे यांचा 9 वा स्नेहसंमेलन कार्यक्रम शुक्रवार 7 फेब्रुवारी व शनिवार 8 फेब्रुवारी 2025 रोजी मोठया उत्साहात पार पडला, स्नेहसंमेलन म्हटले की मुलांच्या उत्साहाला आणि आनंदाला उधाण येते. कला, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञानाचे प्रयोग, खेळ अशा अंगभूत प्रतिभेला यानिमित्ताने बहर येतो. शाळेच्या आवारात ताला-सुरांची गट्टी जमली होती. प्ले ग्रुप, नर्सरी, पहिली ते दाहवी पर्यंतचे विद्यार्थी चित्रपट गितांवर थिरकत होते. अनेक मंजूळ गाण्यांचे सूर ऐकायला येत होते .स्नेहसंमेलनाच्या या जोरदार तयारीमुळे बालकलाकार वेगळ्याच विश्वात रममाण झाले होते.

शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनात आपल्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळावी व चिमुकल्यांना आनंद घेता यावा यासाठी भोर तालुक्यातील किकवी येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा घेण्यात आला. या स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करुन प्रेक्षकांची मने जिंकली.

Advertisement

आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी मा.आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, भोर पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता बाठे, अक्षर इंटरनॅशनल स्कूलचे मॅनेजिंग डायरेक्ट कर्नल यशवंत रेणुसे, भोर पंचायतीचे शिक्षणाधिकारी, किकवी गावचे सरपंच नवनाथ कदम, किकवी पोलिस चौकीचे पोलीस कर्मचारी नाना मदने, मयूर निंबाळकर, निलेश वाव्हळ आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश गीताने करण्यात आली तर देशभक्तीपर गीताने वातावरण भारावून गेले होते,आईचा गोंधळ हे पारंपरिक नृत्य, लोकनृत्य, शेतकरी गीताला उपस्थितांचा त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. यावर्षीचा यशवंत महोत्सव एक वेगळी उंची गाठणारा ठरला.

सामाजिक संदेश देणाऱ्या थीम आणि विद्याथ्यांचे अप्रतिम सादरीकरण, यासाठी शिक्षकांनी घेतलेले कष्ट दिसत होते.

अघोरी-महाकाली नृत्य सादर करताना मुलांनमधील आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता.

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर, संत गोरा कुंभार या महापुरुषांच्या जीवनावरील सादरीकरण अफलातून होते.

विद्यार्थ्यांच्या पालकांनासुद्धा ह्या कार्यक्रमात सहभाग देऊन एक नवीन चांगला आदर्श ठेवला गेला.

प्री प्रायमरी आणि प्रायमरी, नर्सरीच्या विद्यार्थ्यांकडून नृत्य करून घेऊन त्यांच्या कला गुणांना वाव देणारा असा हा कार्यक्रम अप्रतिम झाला.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!