ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविषयीच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा


भोर : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितरीत्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भोर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी भोर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मोर्चात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

मोर्चानंतर भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, शहराध्यक्ष संदीप शेटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, प्रवीण जगदाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, सभापती मनीषा कंक, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदविला. महिलांचा सन्मान अबाधित राखला जावा आणि सार्वजनिक जीवनातील नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!