ताज्या घडामोडी

ग्रॅव्हिटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘एक दिवस शिक्षक’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ! अध्यापन, नेतृत्व व जबाबदारीचा अनोखा अनुभव !! विद्यार्थ्यांकडून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त


पुरंदर : केतकावळे येथील ग्रॅव्हिटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत वर्गांमध्ये अध्यापन केले आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांनी विविध विषय शिकविताना अध्यापन कौशल्य, संवादकौशल्य आणि वर्गव्यवस्थापन यांचा प्रभावी परिचय करून दिला. शिक्षक बनण्याचा अनुभव घेत असताना विद्यार्थ्यांना सहाध्यायांच्या अडचणी, प्रश्न आणि शंका समजून घेण्याची संधी मिळाली.विद्यार्थ्यांना संयम, शिस्त, मार्गदर्शन आणि ज्ञानदान यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून उमगले.

Advertisement

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि शिक्षकांविषयी आदर व कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली. “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार असतो,” हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय हर्षल जगदाळे सर (अध्यक्ष व संस्थापक, डीग्निटी एज्युकेशन सोसायटी), जयश्री जगदाळे मॅडम (विश्वस्त, डीग्निटी एज्युकेशन सोसायटी) तसेच मेघा शेटे मॅडम (प्राचार्या, ग्रॅव्हिटी इंग्लिश मीडियम स्कूल) यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!