ताज्या घडामोडी

भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटातील उमेदवारांसाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात


 

कापूरहोळ : भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचाराला पूर्ण वेग आला असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक भालचंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य जाहीर 4 सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक : सोमवार, २ फेब्रुवारी २०२६

• जोगवडी  – दुपारी ४.००

• धांगवडी  – सार्य: ५.३०

• न्हावी    – सायं ७.००

• भोंगवली – सायं ८.३०

Advertisement

जिल्हा परिषदेचे उमेदवार विक्रम काशिनाथराव खुटवड हे अधिकृत उमेदवार असून, कामथडी पंचायत समिती गणातून तृप्ती विक्रम खुटवड आणि भोंगवली पंचायत समिती गणातून गणेश गोविंद निगडे हे अधिकृत उमेदवार आहेत. मतदारांकडून या तिघांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

या गटामध्ये स्थानिक राजकीय वातावरण चागलेच तापले असून, मतदारांमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर चांगली जागृती होत आहे. प्रचार सभांना शेकडो मतदार हजेरी लावत आहेत. दिवसेदिवस प्रचाराची रंगत वाढत चालली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!