ताज्या घडामोडी

दिवाळीत कापूरहोळ पंचक्रोशीत शिवइतिहासाचा जागर ! किल्ले बनवा, इतिहास सांगा अन् बक्षिसे जिंका !! धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचा उपक्रम


कापूरहोळ : दिवाळीच्या मंगलमय पर्वावर छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि बालशिवाजींच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान, कापूरहोळ पंचक्रोशी यांच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सर्व वयोगटांतील मुला-मुलींना तसेच शाळा, मंडळे आणि घरगुती गटांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी माती, दगड व चुरा यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून आकर्षक किल्ल्यांची निर्मिती करावी. पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन प्लास्टिक व थर्मोकोलच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, स्पर्धकांना त्यांनी तयार केलेल्या किल्ल्याचा इतिहास परीक्षकांसमोर थोडक्यात सांगणे बंधनकारक आहे. त्यामुळे या उपक्रमातून सर्जनशीलतेसोबतच ऐतिहासिक ज्ञानालाही चालना मिळणार आहे.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व मुलांना सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे.

स्पर्धेसाठी नावनोंदणी शुल्क २० रुपये असून, नावनोंदणीची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर २०२६ आहे. किल्ल्यांची पाहणी व परीक्षण ९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी :
• सोपान गाडे ९७६२७५११४२
• अमर गाडे ९७६७३३०३९९
• ओंकार ओंबळे९८९०८६३४१७
• अध्यक्ष सागर गाडे ७०५७७०२१७१
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!