ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह घेतले भीमाशंकराचे दर्शन


सुधीर नितनवरे,                                                           प्रतिनिधी.

खेड : श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासमवेत बारा शिवज्योतिर्लिंगा पैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या भीमाशंकर शिवलिंगाचा मनोभावे अभिषेक व पूजापाठ केला, यावेळी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे, व राज्यात सुख संमृद्धी नांदु दे,अशी प्रार्थना त्यांनी भीमाशंकरा चरणी केली.

Advertisement

मुख्यमंत्री भीमाशंकरला येणार असल्याने शिवसैनिकामध्ये उत्साह निर्माण झाला होता, शिवसैनिकांनी मुख्यमंत्री येणाऱ्या रस्त्याच्या चौकाचौकांमध्ये फ्लेक्सबाजी केल्याचे निदर्शनास आले, शिवसैनिकांनी लाडक्या मुख्यमंत्र्याच्या स्वागता करीता ठिकठिकाणी गर्दी केली होती, सर्व शिवसैनिकांच्या हातामध्ये पक्षाचे झेंडे होते, शिंदे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जय भवानी-जय शिवाजी, हर-हर महादेवच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी त्यांच्या समवेत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, म्हाडाचे अध्यक्ष मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मा. आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना शिरूर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विकास रेपाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख भागवत पोखरकर, ठाणे महानगरपालिका स्थायी समितीचे मा. सभापती राम रेपाळे युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर आदी उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!