राजकीय

संगमनेर सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. शशिकला गोरड, तर व्हा.चेअरमनपदी श्री शहाजी गाढवे यांची बिनविरोध निवड


सुनील सावंत,                                                                 प्रतिनिधी.

भोर : दि.2/9/24 (सोमवार) भोर तालुक्यातील संगमनेर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. शशिकला निवृत्ती गोरड आणि व्हाईस चेअरमनपदी श्री. शहाजी तानाजी गाढवे यांची बिनविरोध निवड झाली.

संगमनेर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. या दोघांच्या विरोधात एक ही अर्ज नसल्याने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणुक बिनविरोध झाल्याची घोषणा केली.सदर सोसायटी ही गेल्या अनेक वर्ष काँग्रेसच्याच ताब्यात राहिली आहे.

Advertisement

भोर,राजगड (वेल्हा),मुळशी विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या. या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे काम चांगल्या पद्धतीने चालविले जाते. यापुढे ही सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यातून सोसायटीचे कामकाज करू असे मत नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी माजी चेअरमन बाळासाहेब कृष्णा बांदल, संचालक बबन बाबुराव बांदल, दिनेश नेवसे, सौ. शांताबाई तुकाराम बांदल, परशुराम मारुती बांदल, लक्ष्मण कोंडीबा आखाडे, रवींद्र भिकू गव्हाणे नितीन नेवसे यांच्यासह संतोष बांदल, संतोष गोरड, सुरेश नेवसे, नितीन बांदल, सिद्धार्थ गोरड, सचिव शिद व सहकारी कोंढाळकर आदी उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!