ताज्या घडामोडी

श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण ! २.४१ कोटींच्या काँक्रीट रस्त्याने भाविकांचा प्रवास सुकर


नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पीएमआरडीएच्या २ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीतून हा रस्ता पूर्ण करण्यात आला असून, यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे.

स्व. ना. अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री सौ. सुनित्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच खासदार सौ. सुप्रिया सुळे आणि आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हा विकास प्रकल्प पूर्णत्वास आला. संसदरत्न खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.

Advertisement

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शंकरभाऊ मांडेकर होते.
यावेळी मा.उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद रणजित शिवतरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, मा. पुणे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, अध्यक्ष रविंद्र बांदल, अध्यक्ष संतोष घोरपडे, सभापती मनिषा कंक, उपसभापती विशाल कोडे, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, युवा नेते अशोक वाडकर, भरत बोबडे, सरपंच उषा कदम, संदीप कदम, नामदेव चव्हाण, मेघा लष्कर, श्रद्धा हाडके, पुरुषोत्तम दातार, रुपेश हरपुडे, हनुमंत कदम यांच्यासह श्री बनेश्वर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी बोलताना सांगितले की, या रस्त्यामुळे श्री क्षेत्र बनेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. तसेच परिसरातील विकासकामांना अधिक वेग मिळून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!