ताज्या घडामोडी

भोंगावली प्रकरणात सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा ! ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे संकेत


कापूरहोळ : भोंगावली येथील प्रस्तावित हाय व्होल्टेज वीज प्रकल्प आणि त्यानंतर घडलेल्या जाळपोळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. या प्रकरणात ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

सुळे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भोंगावली प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भोंगावली परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विकास प्रकल्प राबविताना स्थानिक नागरिकांचा विश्वास व सहभाग आवश्यक असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. गरज भासल्यास मी स्वतः ग्रामस्थांसोबत आंदोलनात सहभागी होईन, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

सुळे यांच्या या भूमिकेमुळे भोंगावलीसह परिसरातील ७१ गावांतील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!