ताज्या घडामोडी

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतराला विधानसभेत मंजुरी


 

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या नियम 110 नुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव मांडला होता, त्यानंतर विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. केंद्राची मंजूरी मिळाल्यानंतरच विमानतळाचे नवे नाव भारताच्या राजपत्रात अधिकृतरीत्या अधिसूचित केले जाईल.

Advertisement

सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मूर्तमेढ रोवणारे समाज सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो तुकाराम महाराज राष्ट्रवादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील धार्मिक घटनांनवर रोखठोक शब्दामध्ये प्रहार करणारे संत होते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनाबोधी निर्माण झालेली होती अशा काळात संत तुकाराम महाराजांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले होते. तसेच ते अध्यात्मिक कवी देखील होते, त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला असून लोहगाव हे त्यांचे आजोळ आहे.

याविषयी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचे पुण्यासह महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी स्वागत केले आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!