ताज्या घडामोडी

हरिश्चंद्री (कापूरहोळ) परिसरात अपूर्ण महामार्ग कामे ठरताहेत जीवघेणी ! कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू


कापूरहोळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हरिश्चंद्री परिसरात कंटेनरखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील अपूर्ण बांधकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि अपुऱ्या सुरक्षितता उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावरील कामे वेळेत पूर्ण न झाल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.

हरिश्चंद्री परिसरात महामार्गाचे रुंदीकरण, पुलांची बांधकामे आणि सर्व्हिस रोडची कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे, अपूर्ण बांधकामे आणि धोकादायक वळणे यांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, प्रवासी वाहने आणि दुचाकींची ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्त्यावरील सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक प्रभावी असणे आवश्यक आहे.

Advertisement

आणखी एखादा गंभीर अपघात घडण्याची वाट न पाहता संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रखडलेली रुंदीकरणाची कामे, पुलांची बांधकामे आणि सर्व्हिस रोडचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच अपघातप्रवण ठिकाणी स्पष्ट सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपाय उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हरिश्चंद्री परिसरातील महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आणखी बळी जाण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रुंदीकरण, पूल व सर्व्हिस रोडची कामे तातडीने पूर्ण करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. आणि आज घडलेत्या घटने बाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करावा.
गणेश गाडे,
उपाध्यक्ष : भारतीय युवा मोर्चा

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!