ताज्या घडामोडी

भोर शहरातील व्यापारी संकुल व जलाशय तलाव उद्घाटन ! विकासकामांवर श्रेयवाद खपवून घेणार नाही : मा.आमदार संग्राम थोपटे


भोर : भोर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले. भोर शहरातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना बरोबर घेऊन काम करत आलो असून, पुढील काळातही जनतेला सोबत घेऊन विकासकामे करत राहणार आहे.

नगरपरिषदेतील भाजप उपनगराध्यक्ष, गटनेते व नगरसेवकांचे काम उत्कृष्ट असून, विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी टीम आहे. आम्ही केलेल्या विकासकामांवर कोण श्रेयवाद करणार असेल, तर अन्याय खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा थोपटे यांनी दिला.

Advertisement

श्री छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल व राजमाता जिजाऊ जलाशय तलाव या ११ कोटी ९८ लाख रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या संकुलात ४३ नवीन गाळे बांधले असून, तरुणांनी येथे उद्योग-व्यवसाय सुरू करावेत, जेणेकरून व्यापाराला चालना मिळेल, असे आवाहन त्यांनी केले. जुन्या सात-आठ गाळेधारकांना नियमांनुसार नवीन गाळे मिळवून देणार आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर वढणे म्हणाले, जनतेच्या मनातील नेता म्हणून थोपटेंची ओळख असून, त्यांचे काम कौतुकास्पद आहे.

या प्रसंगी जि.प. सदस्या स्वरूपा थोपटे, पं.स. सदस्य सुषमा चव्हाण, रोहन बाठे, संतोष धावले, मानसिंग धुमाळ, सचिन हरणस्कर, सचिन मांडके, उपनगराध्यक्षा अॅड. जयश्री शिदि, गटनेते अमित सागळे, नगरसेवक सुमंत शेटे, जगदीश किरवे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!