भोर तालुक्यातील कांबरे खे.बा.येथे विहिरीतून पाण्याची मोटर चोरीस ! शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान
नसरापूर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. गावच्या सामाईक जमिन गट क्र. ७६ मधील विहिरीवरून अज्ञात चोरट्याने २५ वर्ष जुनी ७.५ एचपीची टेक्समो मोनोब्लॉक कंपनीची हिरव्या रंगाची पाण्याची मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
शेतकरी विठ्ठल आनंदराव कोंढाळकर (४५, रा. कांबरे खे., ता. भोर) यांचे ₹१०,००० चे नुकसान झाले असून, त्यांनी याबाबत राजगड पोलिस स्टेशनला गु.र. क्र. १५८/२०२६ अंतर्गत (बीएनएस ३०३(२)) गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ ते २० एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत या कालावधीत चोरट्याने कोंढाळकर यांच्या मालकीची मोटर सहमतीशिवाय लाबाडीच्या हेतूने चोरली. शेती व्यवसायात गुंतलेले कोंढाळकर यांना या चोरीमुळे शेती व्यवस्थेवर मोठा फटका बसला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर २१ एप्रिलला फिर्याद दाखल झाली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोहवा कोल्हे (१८६०) व तपास अंमलदार पोहवा अडवाल (१९४७) करीत आहेत.
पोलिसांनी परिसरातील पुरावे तपासण्यास सुरुवात केली असून, अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. या चोरीमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी म्हणाले, “शेती हंगामात अशा घटना शेतकऱ्यांना मोठा धक्का देतात.”




