कारागृह पोलीस अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा २०वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
कारागृह पोलीस अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा २०वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
येरवडा : दि. ३१ डिसेंबर २०२५
पुणे येथील कारागृह पोलीस अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा २० वा वर्धापनदिन आणि सण २०२६ च्या दिनादर्शिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे दि. ३१ डिसेंबर रोजी येरावडा मध्यवर्ती कारागृहात सजेलेल्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रमुख अतिथी म्हणून येरावडा मध्यवर्ती कारागृहाच्या सहायक अधीक्षक श्रीमती पल्लवी कदम उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते संस्थापक स्व. माधवराव कर्वे (माजी पोलीस महानिरीक्षक, तुरुंग) यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे सचिव भरत बंडगर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. चेअरमन मनोज गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. प्रमुख अतिथींनी संस्थेची प्रगती व सभासदांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सण २०२६ च्या दिनादर्शिकेचे प्रकाशन करून केक कापण्यात आला. कार्यक्रमास उपाध्यक्षा मयुरी तुवर, अतुल पटेकर, सहसचिव योगेश पाटील, संचालक प्रमोद इंगळे, प्रमोद जाणराव, दौलत खिलारे, साहेबाराव वाळकुले, संचालिका प्रणाली कोकाटे, लीला धुमाळ, लिपिक प्रिया शिर्के, स्वाती बडेकर व अनेक सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना सोनवणे यांनी तर विशेष सहकार्य अविनाश पवार यांनी केले.




