ताज्या घडामोडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा निगडीत भव्य शुभारंभ ! चिखले दाम्पत्याने ‘रणशिंग’ फुंकले


 

पिंपरी: निगडीच्या राजकारणात परिवर्तनाची चाहूल वाजली. शहराध्यक्ष सचिन तुकाराम चिखले व माजी नगरसेविका अश्विनीताई सचिन चिखले-मराठे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ सोमवार, दि. २२ डिसेंबर रोजी दुर्गामाता मंदिर, मनसे जनसंपर्क कार्यालय येथे झाला. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण व मनसे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण परिसर मनसेमय झाला.

Advertisement

कार्यकर्त्यांची ऊर्जा, नागरिकांचा उत्साह व जनतेचा विश्वास’ या त्रिसूत्रीने हा कार्यक्रम विजयाची नांदी ठरला. सचिन चिखले हे अनुभवी नगरसेवक व गटनेते म्हणून ओळखले जातात. अश्विनीताई पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पहिल्या मनसे नगरसेविका असून, निर्भीड व स्वच्छ भूमिकेने स्वतंत्र नेतृत्व निर्माण केले. सत्तेपेक्षा सेवा, शब्दांपेक्षा काम व आश्वासनांपेक्षा परिणाम हे त्यांचे बळ. “अनुभव + विश्वास + कार्य = निश्चित विजय” या सूत्रावर चिखले दाम्पत्य प्रत्येक घरापर्यंत विकास, समस्यांना उत्तर व नागरिकांसोबत खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प घेऊन मैदानात उतरले.

सचिन चिखले म्हणाले, “जनतेची उपस्थिती हीच आमची ताकद. निगडीच्या विकासासाठी मनसेचे रेल्वे इंजिन थांबणार नाही. हा शुभारंभ ऐतिहासिक ठरला.” मनसेची निवडणूक निशाणी ‘रेल्वे इंजिन’ हे विकासाच्या वेगवान प्रवासाचे प्रतीक असून, जनतेच्या साथीने परिवर्तनाची गती वाढेल. मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!