ताज्या घडामोडी

महाराष्ट्र १५ वर्षा खालील महिला क्रिकेट संघात भोर तालुक्यातील स्वरा गाडे, श्रावणी रावळ यांची निवड


 

भोर : दि. २४ डिसें. (बुधवार) भोर तालुक्यातील अंबाडे येथील स्वरा गाडे व भोर शहरातील बजरंगआळी येथील श्रावणी रावळ या दोघींची महाराष्ट्र अंडर-१५ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कोणत्याही पायाभूत सुविधा नसताना या दोन्ही खेळाडूंच्या अथक मेहनतीने हे यश मिळवले असून, तालुक्यातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

राजगड ज्ञानपीठाच्या जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, भोर येथे इयत्ता आठवीत शिकणारी श्रावणी पुणे येथील विलास क्रिकेट क्लबकडून राज्य निमंत्रित अंडर-१५ स्पर्धेत खेळली. तारू क्रिकेट अकॅडमी, भोर येथे विश्वजीत तारू आणि पुण्यातील ब्रिलियंट क्रिकेट अकॅडमीचे नितीन सामल यांच्या मार्गदर्शनाने तिने निवड चाचणीत बाजी मारली.

Advertisement

स्वरा गाडेनेही असाच घाम गाळून तसेच प्रतिभाशाली खेळ करुन संघात स्थान मिळवले.यापूर्वी राज्यभरातील ७५० हून अधिक खेळाडूंपैकी केवळ १५ ची निवड होत असते. बीसीसीआय नियमांनुसार हा संघ २ जानेवारीपासून केरळ येथे देशभरातील संघांसोबत सामने खेळणार आहे.

श्रावणीचे वडील राजेंद्र रावळ, पालक व शाळेने मिळून दिलेल्या साथीमुळे हे शक्य झाले. प्राचार्या रुबिना सय्यद, राजगड ज्ञानपीठाचे अध्यक्ष संग्राम थोपटे, मानद सचिव स्वरूपा थोपटे यांनी श्रावणीचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!