विद्यार्थ्यांना बिबट्यापासून संरक्षणाचे धडे ! हिर्डोशी विद्यालयात वन आधिकारी इंगवले यांचे मार्गदर्शन
वसंत मोरे,
भोर.
हिर्डोशी : बिबट्यापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण कसे करावे, याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मार्गदर्शन केले.हिर्डोशी येथील समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयात बिबट्याच्या धोक्यापासून स्वसंरक्षणाचे उपाय वनाधिकारी श्री इंगवले यांनी विद्यार्थ्यांना शिकवले.
ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरले. विद्यार्थ्यांनी घनदाट झाडीतून जाणे टाळावे, रात्री एकटे हिंडू नये, वेगळ्या आवाजाने प्राण्यांना दूर ठेवावे, असे इंगवले यांनी सांगितले. तसेच, बिबट दिसल्यास मोठ्यांना कळवावे आणि शांतपणे मागे हटावे, असे सल्ले दिले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हांडे मॅडम यांनीही स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक घालून समजावले. सूत्र संचालन डांगे सर यांनी कुशलतेने केले, तर आभार कुडले सर यांनी मानले.
यावेळी रांजणे मॅडम, कानडे सर, दळवी सर उपस्थित होते. हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी मैलाचे ठरले असून, गावकऱ्यांसाठीही उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हांडे मॅडम यांनीही स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक घालून समजावले. सूत्र संचालन डांगे सर यांनी कुशलतेने केले, तर आभार कुडले सर यांनी मानले.




