” गड आला, पण सिंह गेला ” थोपटे यांना भोरमध्ये धक्का ! भाजपला बहुमत परंतु राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदावर करिश्माई विजय
वसंत मोरे,
भोर.
भोर : पुणे जिल्ह्यातील भोर नगरपालिका निवडणुकीने राजकारणात खळबळ उडवली. भाजपने २० जागांपैकी १६ जागा जिंकून बहुमत मिळवले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदावर करिश्माई विजय मिळवला. राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे यांनी भाजपच्या संजय जगताप यांचावर निर्विवाद विजय मिळवला आहे.
भोरमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे युग सुरू झाले आहे. हे यश स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजन, आमदार शंकर मांडेकर व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या नेतृत्वाचे परिणाम आहे. ही लढत केवळ पक्षांची नव्हती, तर आजी-माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची होती.
राष्ट्रवादीला फक्त ४ जागा मिळाल्या असल्या तरी रामचंद्र आवारे यांच्या रूपाने नगराध्यक्षपद मिळवून त्यांनी थोपटे यांच्या प्रभावाला मोठा धक्का दिला.या निकालाने भोरच्या राजकारणात नव्या वळणाची चिन्हे दिसत आहेत. थोपटे गटाला हा धक्का लक्षणीय असून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहिला मिळत आहे. निवडणुकीमुळे आता भोरच्या विकासाच्या दिशेने नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.




