ध्रुव प्रतिष्ठानने आशा सेविकांसाठी दाखवला ‘आशा’ चित्रपट ! सेविकांना प्रोत्साहनार्थ दोन शो !! ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक व सन्मान
भोर : ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दि. २० रोजी ‘आशा’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. भोर तालुक्यातील १५० आशा सेविका व आठ गट प्रवर्तकांच्या जीवनातील समस्या व मार्गदर्शन यांचा चित्रपटात प्रभावीपणे चित्रण केले आहे. सेविकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानने फिल्मचे दोन शो रिझर्व केले होते.
फिल्मच्या पहिल्या शो ला आंबवडे, हिर्डोशी, नेरे, नसरापूर आरोग्य केंद्रातील ११० आशा सेविका उपस्थित होत्या. उर्वरित राहिलेल्या
सेविकांना मंगळवारी दुपारी १२ वाजता दुसरा शो दाखवण्यात येणार आहे, चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या सेविका व गट प्रवर्तकांची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
प्रत्येकीचा सन्मान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर व मनिषा केळकर यांनी आयोजन केले. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय तिडके, तालुका समूह संघटक अनिल भडे, गट प्रवर्तक कविता आलगुडे, सुरेखा म्हस्के, लक्ष्मी बुदगुडे व इतर उपस्थित होते.




