जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर ! पहा तुमच्या झेडपीत अध्यक्षपद कोणासाठी
मुंबई : जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. राज्यात मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे.
राज्यातील ३४ जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात, जिल्ह्यावर नियंत्रण कोणत्या पक्षाचं आणि अध्यक्षपदी कोण, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. अखेर आज ही सोडत जाहीर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या सामाजिक घटकासाठी आहे हे पाहून राजकीय पक्ष आपले डावपेच आखतात.
राज्यातील जिल्हा परिषदा आणि त्यांचे आरक्षण पुढील प्रमाणे
१.पुणे – सर्वसाधारण
२. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
३. सांगली – सर्वसाधारण (महिला)
४. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
५. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला
६. ठाणे -सर्वसाधारण (महिला)
७. पालघर – अनुसुसूचित जमाती
८. रायगड- सर्वसाधारण
९. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१०. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
११. नाशिक – सर्वसाधारण
१२. धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१३. नंदूरबार-अनुसूचित जमाती
१४. जळगांव -सर्वसाधारण
१५. अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)
१६. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
१७. जालना -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१८. बीड – अनुसूचित जाती (महिला)
१९. हिंगोली – अनुसूचित जाती
२० नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
२१. धाराशिव – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)
२२. लातूर – सर्वसाधारण (महिला)
२३. अमरावती – सर्वसाधारण (महिला)
२४. अकोला -अनुसूचित जमाती (महिला)
२५. परभणी – अनुसूचित जाती
२६. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
२७. बुलढाणा – सर्वसाधारण
२८. यवतमाळ -सर्वसाधारण
२९. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
३०. वर्धा- अनुसूचित जाती
३१. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
३२. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
३३. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
३४. गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)




