भोर नगरपरिषद निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात ! भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहिर सभा
भोर : १ डिसेंबर २०२५ महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते ना. देवेंद्रजी फडणवीस येत्या सोमवारी १ डिसेंबर २०२५ दुपारी १:३० वाजता जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, इंग्लिश मीडीयम शाळा समोर, भोर येथे भोर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भोर नगरपालिका निवडणुक लढवीत आसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारांसाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाने केले आहे. भोरमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांचा नगरपालिकेवरील प्रबळ वर्चस्व आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास गतिमान होत आहे. भाजपा नेते मंडळी यावेळी या नगरपालिकेवर पुन्हा संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या प्रचारसभेत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, आगामी निवडणुकीत विजयासाठी भरभरध्द तयारी सुरू असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.




