ताज्या घडामोडी

पुणे-बेंगलोर महामार्गावरील कापूरहोळ गावच्या चौकातील हॉटेल ज्योतिबा समोर अपघात ! एका वृद्धाचा दु:खद मृत्यू


कापूरहोळ : पुणे-बेंगलूर महामार्गावरील कापूरहोळ गावच्या चौकात  29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता अपघात झाला. वृद्ध जगन्नाथ धोंडिबा कुभार (वय 84 वर्ष, राहणार – हिवरे, ता- कोरेगांव, जि. सातारा) यांना चारचाकी गाडीने धडक दिली. अपघात करणारी गाडी क्रमांक MH04 LT 6127 चा चालक राजेश प्रभु बोरसे (वय 45 वर्, राहणार 201 नक्षत्र गॅलक्सी, लोढा पॅराडाईज रोड, माझी वाडा, पश्चिम ठाणे) होता. जगन्नाथ कुभार रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला आहे.

Advertisement

यावेळी तत्परता दाखवत श्री गुरुदेव जगतगुरु नरेंद्र महाराज नाणीज धाम रत्नागिरी यांच्या संस्थेच्या ॲम्बुलन्सचे इन्चार्ज तुळशीराम रघुनाथ अहिरे यांनी तत्परता दाखवत  वृद्धांस सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस चौकीचे नाना मदने साहेब व नरुटे साहेब घटनास्थळी उपस्थित राहून मदत केली.या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. पोलिसांनी नागरिकांना चौकात सावधानी घेण्याचे आवाहन केले आहे.

पुढील तपास निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखला अंमलदार पोलीस हावलदार खरात व तपास पोलीस हावलदार मयुर निंबाळकर करत आहेत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!