संवेदनशील कवी व उत्कृष्ट शिक्षक मोहन भगत सरांचे निधन ! शिक्षणक्षेत्र शोकाकुल
कापूरहोळ : मुळशी तालुक्यातील बहुली गावचे आदर्श शिक्षक व संवेदनशील कवी मोहन भगत सर यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. २ जानेवारी १९७५ रोजी जन्मलेले भगत सर हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन आई-वडिलांच्या ‘शिक्षक व्हा’ स्वप्नाला साकार करणारे प्रेरणास्थान ठरले.
पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ
उत्कृष्ट सेवा देत विविध ठिकाणी कार्यरत राहिले. २०१८ ते २०२३ पर्यंत कापूरहोळ शाळेत सहा वर्षे व नंतर सुतारवाडी व शिंदेनगर येथे सेवेत होते.
आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, हुशार, उपक्रमशील, प्रामाणिक व वक्तशीर हे त्यांचे वैशिष्ट्य. विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते जोडणारे, समाजदुःख कवितेतून मांडणारे कवी म्हणून ओळखले जाणारे भगत सरांचे बालगीत ‘अहो आईबाबा घरी आणा वायफाय’ विशेष गाजले.
कविता-चारोळ्या विद्यार्थ्यांच्या ओठांवर आजही रुंजी घालतात. अचानक निधनाने शिक्षणक्षेत्रात पोकळी निर्माण झाली. पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती व परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.




