राजगड तालुक्याच्या काँग्रेस अध्यक्षांचा भाजप प्रवेश ! कारखाना व शेतकऱ्यांसाठी विकास संकल्प
भोर : राजगड तालुक्यातील सक्रिय काँग्रेस अध्यक्ष संजय पांडुरंग वालगुडे यांनी सहकाऱ्यासह माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्ष संघटना उभी राहिली असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत,
भाजपा प्रवेशानंतर वालगुडे म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत राजगड कारखान्याला सुगीचे दिवस येणार आहेत. कामगारांना बळ मिळेल, तर शेतकऱ्यांना उसाला चांगला दर मिळेल. संग्राम थोपटे व अंनतराव थोपटे साहेबांसोबत कारखाना व तालुक्यातील काम केले असल्याने त्यांची विकासाची विचारधारा पुढे नेणे गरजेचे आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहून तालुक्याचा विकास करू असे बोलत होत.
भाजपा प्रवेशाने राजगड तालुक्यातील विविध विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. राजगड भाजपकडून यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.




