निगडी-यमुनानगर-से.नं.२२ ची साथ शिवसेनेलाच ! शिवसेना प्रचाराने घेतला वेग !! मतदारांकडून विजयाचा विश्वास
निगडी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराने जोर धरला आहे. यमुना नगर, निगडी गावठाण, साईनाथ नगर, वसाहत आणि ओटा स्कीम या भागातील मतदार यंदा पूर्ण ताकदीने शिवसेनेला साथ देणार असल्याचा ठाम विश्वास सामजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी व्यक्त केला.प्रभागातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुलभा उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे आणि तानाजी शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. हे उमेदवार मतदारांच्या दारोदारी जाऊन प्रचार करत असल्याने स्थानिक नागरिक त्यांना विजयासाठी आशीर्वाद देत आहेत.
सुलभा उबाळे आणि शुभांगी बोऱ्हाडे या पूर्वी नगरसेविका राहिल्यामुळे प्रभागात त्यांचा प्रभाव आहे. त्यांनी गोरगरीबांना नेहमी सहकार्य केले असून, विविध विकासकामांना हातभार लावला आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे म्हणाले, “या भागातील मतदार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने प्रभावित झाले आहेत. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यासारख्या समस्या सोडवण्यात आमच्या उमेदवारांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यंदा हा प्रभाग शिवसेनेचाच राहणार, असा आम्हाला विश्वास आहे.”निवडणूक तापली असताना शिवसेनेचा हा प्रचार मतदारांपर्यंत पोहोचला असून, उमेदवारांच्या दारोदारी प्रचाराने जोम धरला आहे.
स्थानिक नागरिक म्हणतात, “सुलभाताई आणि शुभांगीताईनी, तानाजी शिंदे यांनी आमच्या समस्या ऐकल्या आणि सोडवल्या आहेत त्यांना पुन्हा संधी देऊ. यावेळी प्रभागातील मतदारसंघ मजबूत असुन शिवसेना विजय मिळवेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.




