ताज्या घडामोडी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भोरच्या हर्णसमध्ये मारुती वॅगनआर चोरीस


कापूरहोळ : भोर तालुक्यातील मौजे हर्णस गावच्या हद्दीत अनिल राठोड यांच्या प्लॉट जवळून ₹३ लाख किंमतीची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी वॅगनआर कार चोरीस गेली. फिर्यादी अफताप इकबाल शेख (२५, रा. साईबाबा नगर, कोंढवा, पुणे) यांच्या मालकीची ही कार (नं. MH 03 DA 8288, इंजिन K10BN8192330, चॅसीस MA3JMT31SKA103254) १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान चोरली गेली.

Advertisement

फिर्यादीनुसार, कार प्लॉट शेजारी उभी असताना अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली. शेख यांनी राजगड पोस्ट येथे गु.र.नं. ०६/२०२६ अंतर्गत BNS कलम ३०३(२)नुसार तक्रार दाखल केली आहे.गु.दा. ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी दाखल झालेल्या FIR नुसार (स्टे डाक १५/२०२५), पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पो.हवा. कोंढाळकर (२४४२) व तपासी अधिकारी पोहवा. मदने (२३२०) करत आहेत.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, स्थानिक व्यापारी व रहिवाशांकडून माहिती घेत आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांना माहिती असल्यास संपर्क आव्हान केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!