PMRD कडुन अनाधिकृत बांधकामावर हातोडा : 3 दिवसात 900 च्यावर अनाधिकृत बांधकामावर कारवाई
पुणे : पुणे शहरा भोवती असणाऱ्या राष्ट्रीय, राज्यमार्गावरील अनधिकृत बांधकामे निष्कासन करण्याची मोहीम गत तीन दिवसापासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. यात 3 ते 5 मार्च दरम्यान विविध भागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष्य करण्यात येत असून एकूण 900 च्यावर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या कारवाईमुळे निश्चितच संबंधित भागातील वाहतुक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे.
पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी पीएमआरडीएने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून बुधवार 5 फेबुवारी पासुन पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता व पुणे चांदणी चौक ते पौड रस्ता अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सकाळी 9:30 वाजेपासून सुरु करण्यात आलेल्या या कारवाई जवळपास 252 अनधिकृत बांधकाम (25,200चौ.फु.) चे निष्कासन करणेत आले.
बहुतांश स्थानिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतले. या अतिक्रमण निष्कासन मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ३ मार्चला 201 अनधिकृत बांधकाम तर 4 मार्चला 453 अनधिकृत बांधकामे काढण्यात आली. गत 3 दिवसात एकूण 904 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून 90 हजार 600 चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी यांचेमार्फत सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करू नये असे आवाहन करण्यात आले.




