ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील नेरे व खानापूर माध्यमिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा


 

भोर : दि. ४ (ऑक्टोंबर) शनिवार भोर तालुक्यातील खानापूर येथील श्री सरनोबात सिदोजी थोपटे महाविद्यालय व नेरे येथील पंचक्रोशी महाविद्यालयात भोर वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. वन विभागातील अधिकाऱ्यांनी व पिसावरे गावातील पक्षी अभ्यासक कु.रविषा बरदाडे, अनिकेत साप्ते व सुरज अडसूळ यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना जंगल व त्याच्या अधिवासातील वन्यजीवांचे, पक्षांचे रक्षण व त्यांचे संरक्षण कसे करावे याबाबत जनजागृती करून माहिती देत प्रात्यक्षिके दाखविली.

Advertisement

भोर वनविभागातील सहाय्यक वनसरक्षक शितल राठोड व वनपरीक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपाल सुग्रीव मुंढे, वनरक्षक पी. एम . माने ,संदीप शिवले,समीर जाधव, सुदाम राठोड,जयश्री पवार, श्री के, एम. हिमोणे,श्री सुभाष गायकवाड, कु, साक्षी शिंदे या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी सरनोबात सिदोजी थोपटें विदयालयाचे प्राचार्य  डी.एस.कुमकर सर, वनसेवक रुनेश गोरडे व अविनाश चव्हाण यांच्यासह शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही त्यांच्या शंका, समस्यांचे वन अधिकाऱ्यांकडून निरसन करून घेतले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!