पुण्यामधील महाविकास आघडीचे एकमेव आमदार बापूसाहेब पठारेना मारहाण : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ
पुणे : पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार पठारे यांना मारहाण करण्यात आल्याने वडगावशेरी मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
पुण्यातील लोहगाव परिसरात एका ठिकाणी ४ ऑक्टोंबर (शनिवार) रोजी माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार बापू पठारे उपस्थित होते. यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) गटामधील लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सभापती बंडू खांदवे बाहेर येत असताना स्थानिक मुद्यांवरुन दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली आणि या वादाचे रूपांतर काही वेळातच जोरदार हाणामारीत झाले. आमदार पठारे यांना काही लोकांनी मारहाण केली.
आमदार पठारे हे पुण्यातील महाविकास आघाडीचे एकमेव आमदार आहेत. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या तिकीटावर ते विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. ते दुसऱ्यांदा वडगाव शेरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असुन त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा पराभव केला आहे.