क्राईम

परप्रांतीय मजुरांकडून भोर तालुक्यातील मोहरी खुर्द येथील शेतकरी महिलेची १.७० लाख रुपयांची फसवणूक


 

नसरापूर : मोहरी खुर्द (ता. भोर) येथील उषा संतोष तळेकर व संतोष तळेकर शेतकरी दापत्याचे पॉली हाऊस असुन त्यांना त्याकामी मजुरांची आवश्यकता लागत असते, त्यांना परप्रांतीय दोन मजुरांनी कामावर येतो असे सांगून त्यांच्याकडून ऑनलाईन १ लाख ७० हजार ७०० रुपये घेऊन फसवणूक केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

२ एप्रिल २०२५ ते ३० जुलै २०२५ या कालावधीत आरोपी जयसिंग छगन बडोले आणि त्याचा भाऊ जैतराम छगन बडोले (दोघे रा. सैद्रीघाटी, ता. झिरन्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) यांनी मोहरी येथील तळेकर दाम्पत्याच्या पॉलिहाऊसवर काम करण्यास येतो असे सांगून त्यांच्याकडून ॲडव्हान्स स्वरूपात ऑनलाइन (गुगल-पे व फोन पे)  माध्यमातून वेळोवेळी १.७० लाखांची रक्कम घेतली व स्वतः जयसिंग कामावर न येता त्याने त्याच्या भावाला जैतराम यास पॉलीहाऊसवर कामास पाठवून तळेकर दापत्याचा विश्वास संपादन करुन नातेवाईकांबरोबर मांढरदेवीला दर्शन करुन येतो असे सांगून त्याच्या मुळ गावी मध्यप्रदेशला पळून गेला आहे

Advertisement

याप्रकरणी उषा संतोश तळेकर (वय ३७ वर्षे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही आरोपीं विरोधात गु.र.नं. ३५४/२०२५ बी.एन.एस ३१८ (४),३१६ (२),३/५ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मारदर्शनाखाली तपासी अंमलदार खरात व इंगळे करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!