जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक ! राष्ट्रवादी काँग्रेसची कारी गणातील आढावा बैठक संपन्न
भोर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भोर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरिता पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकांचा धडाका लावला आहे. कारी गणातील बैठक मा. पुणे जिल्हा परिषद उपाअध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या अध्यक्षखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुढील बैठका घेण्याबाबत आढावाही घेण्यात आला.
यावेळी रणजित शिवतरे कारी गणंमध्ये मंजुर केलेली कामे खालील प्रमाणे सांगितली.
1) कारी ता भोर झान्जेवस्ती सभामंडप बांधणे – रु 5 लक्ष,
2) गवडी ता भोर व्यायामशाळा वरील उर्वरित सभामंडप बांधणे 5 लक्ष,
3) बालवडी ता भोर गणेश मंदिर सभामंडप बांधणे – 4 लक्ष,
4) हिर्डोंशी ता भोर टाकीचा माळ सभामंडप बांधणे – 6 लक्ष,
5) नांदघुर (जयतपाड) ता भोर सभामंडप बांधणे – 5 लक्ष,
6) करंजेवाडी (करंजे) ता भोर सभामंडप बांधणे – 5 लक्ष,
7) रायरी ता भोर सभामंडप बांधणे रु 10 लक्ष,
8) टिटेघर ता भोर पिंपळवाडी उर्वरित सभामंडप बांधणे – रु 5 लक्ष,
9) सांगवी वेखो ता भोर उर्वरित सभामंडप बांधणे – 5 लक्ष,
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक लवकरच होण्याचे संकेत मिळत असल्याने दुसऱ्या फळीतील इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी प्रदर्शनही सुरू झाले आहे. यंदा काहीही झाले तरी मैदानात उतरणारच, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. त्यामुळे इच्छुकांची डोकेदुखी वाढणार आहे.नेतेमंडळींकडून चाचपणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी नेतेमंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवला आहे. बहुसंख्य सर्वच राजकीय पक्षांकडून छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी माजी पुणे जिल्हा परीषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे, राजू गिरे तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.