क्राईम

राजगड पोलिसांची धडक कामगिरी ! भोर तालुक्यातील वीरवाडी येथे चंदन चोरी करणाऱ्या तिघांना अटक


नसरापूर : भोर तालुक्यातील वीरवाडी गावच्या हद्दीतील गट नंबर १८७ या गायरान शेतीमधील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेत असताना शेतकरी विजय शिळीमकर यांच्या निदर्शनास आले, या प्रकरणी त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तीन चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वीरवाडी गावात राहत असून ५ ऑक्टोंबर (रविवार) रोजी जी ४ वाजता त्यांची गायरान शेती गट नंबर १८७ मधील चंदनाचे झाड कापुन नेत असताना  १) महेश मुकेश भोसले वय २८ वर्ष, राहणार भादे, ता.खंडाळा, जि.सातारा २) अंकिता मैनेष भोसले वय २५ वर्ष, राहणार भादे, ता.खंडाळा, जि.सातारा ३) गायत्री जकल पवार वय ४० वर्ष, राहणार शेडगेवाडी, ता.खंडाळा, जि.सातारा हे तीन चंदन चोर मुद्देमालासह सापडली आहेत.

Advertisement

त्यांच्याकडून १) चंदनाच्या झाडाचे लहान मोठे तुकडे अंदाजे ३ किलो वजन असलेले १२,०००/- किंमतीचे २) लोखंडी कुऱ्हाड १ नग ३) लोखंडी कुदळ २ नग ४) बजाज कंपनीची मोटर सयकल बिना नंबर प्लेट असलेली किंमत अंदाजे ५०,०००/- असा एकुण ६२, ०००/- रुपये किंमतीचा ऐवज सापडला आहे. त्यांच्याविरुद्ध पुन्हा रजिस्टर नंबर ३६२/२०२५ BNS कायदा ३०३(२), ३(५) अंतर्गत राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाच्या पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गवळी सो यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अमलदार पडळकर (१७९८) तपासी पोलीस हवलदार (१९४७) हे करत आहेत.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!