तरुण नेतृत्वाच्या दिशेने विक्रम खुटवड यांची दमदार वाटचाल
कापूरहोळ : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गटातुन विक्रम काशिनाथराव खुटवड यांचे नाव इच्छुक उमेदवारांमध्ये ठळकपणे समोर येत आहे. सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेले विक्रम खुटवड हे तरुणांचे प्रभावी नेतृत्व ठरत असून अनेकांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत.
विक्रम खुटवड हे तरुणांमध्ये जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण यांचा आदर्श प्रस्तुत करत आहेत. त्यांनी स्थानिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेत असल्याचे दिसुन येते, गटातील वडीलधारी मंडळी यांचे मार्गदर्शन लाभत असल्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे.
स्थानिक पातळीवर विविध विकासकामे, तरुणांसाठी उपक्रम, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे कामथडी- भोंगवली गटासाठी एक सक्षम, तरुण आणि समर्पित नेतृत्व म्हणून विक्रम काशिनाथराव खुटवड यांच्याकडे पाहिले जात आहे. या गटातील बऱ्याच गावाच्या मतदारांमध्येही यांच्याविषयी सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे.