आंबेडकरवादी युवा भोर तालुका अध्यक्षपदी प्रकाश ओव्हाळ तर सचिवपदी अरुण रणखांबे यांची बिनविरोध निवड
भोर : दि. २१ सप्टेंबर (रविवार) रोजी दीक्षाभूमी भोर येथे झालेल्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या जेष्ठ मंडळी व तरुणांनी मिळुन आंबेडकरी चळवळीचे युवा कार्यकर्ते प्रकाश ओव्हाळ यांची आंबेडकरवादी युवा भोर तालुका अध्यक्षपदी तर अरुण रणखांबे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली, त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
दीक्षाभूमीतील भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीला सुरुवात झाली. युवा कार्यकर्ता अरुण रणखांबे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले, या बैठकीमध्ये सर्वांनुमते ठराव करण्यात आला की आंबेडकरवादी युवा ही संघटना सध्या तालुकास्तरावर कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्ती केंद्रित न राहता समाज व सामाजिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी पूर्ण वेळ कार्यरत राहील.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या समाजाची निर्मिती, धम्मतत्व ज्ञानाचा प्रचार व प्रसार, सामाजिक समस्या, शैक्षणिक विकास व त्यातून आर्थिक सुबत्तता अशा विविध समाज हिताच्या ध्येय उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ही संघटना अहोरात्र कार्यरत राहील. अशी संघटनेची ध्येयधरणे बैठकीमध्ये ठरवण्यात आली आहेत. त्यांच्या या बिनविरोध निवडीमुळे भोर तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, आंबेडकरी पक्ष व संघटना तसेच संविधान प्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
• भोर तालुक्यातील संविधानाला मानणाऱ्या आणि अन्यायावर प्रहार करणाऱ्या तरुणाईची ताकद एकत्रित करून अन्याय करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार.
कु.प्रकाश ओव्हाळ.
अध्यक्ष : आंबेडकरवादी युवा भोर तालुका.
• समाज्याच्या न्याय्य, हक्कांसाठी लढूच आणि वेळ आली तर सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधातही उभे राहू.
कु.अरुण रणखांबे.
सचिव : आंबेडकरवादी युवा भोर तालुका.