ताज्या घडामोडी

५०० गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट सुकर ! कुलदीपतात्या कोंडे युवा मंच आणि सिंहगड फाऊंडेशन यांचा अभिनव उपक्रम


नसरापूर : कुलदीपतात्या कोंडे युवा मंच भोर-राजगड-मुळशी आणि सिंहगड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१ सप्टेंबर (रविवार) रोजी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जानकी मंगल कार्यालय बनेश्वर (नसरापूर) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ५०० गरजु विध्यार्थना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट सुकर होणार आहे.

घराच्या दारापुढे सायकल आल्याने विद्यार्थीनींचा शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास अधिक सुखकर झाला असुन या उपक्रमांमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या तसेच घरापासून तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात शाळा व महाविद्यालय असलेल्या विद्यार्थ्याना सायकल वाटप केली आहे.

Advertisement

५०० गरजु विद्यार्थी या उपक्रमासाठी पात्र ठरले होते, शिक्षण घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी तीन ते चार किलोमीटर चालत शाळेत जात असतात, विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याने गरजु विद्यार्थ्यांना मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असल्याने पुण्य पदरात पडल्याचे समाधान मिळाले असे कुलदीपतात्या कोंडे म्हणाले.

यावेळी शिवसेना जिल्हाअध्यक्ष रमेशबापू कोंडे, मा. जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पांगरे. प्रफुलभैया धुमाळ, किशोर बारणे, काका कोंडे, स्वप्नील गाडे, प्रशांत दानवले, गणेश धुमाळ, आदी मान्यवरसह उपस्थित होते.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!