भोर तालुक्यातील वरवे येथे रात्रीस चोरांचा सनसनाटी डल्ला ! १ दुचाकी, ३ मोबाईल व ५० हजार रोखड लंपास
नसरापूर : २५ फेब्रुवारी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वरवे गावात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरट्याचा धाडसी डाव करत स्थानिक स्क्रॅप व्यापारी सलमान नईम खान (२७, रा. वरवे ब्रिज) यांच्या शेडमधून दुचाकी, तीन मोबाईल फोन व ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे, ही चोरी २३ फेब्रुवारी रात्री १०.३० ते २४ फेब्रुवारी रात्री २.४० या वेळेत घडली असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले.
फिर्यादीनुसार, अविनाश मोरे यांच्या जागेवर असलेल्या उघड्या शेडमध्ये कामगार हमीदुल्ला शाह, कुलदीप वर्मा व सलीम खान यांचे मोबाईल ठेवले होते. शेडच्या बाहेर पार्क केलेली सलमान यांची होंडा डिओ १२५ सीसी दुचाकी (MH12WQ5966, चासिस ME4JF99CKPWOO2978) सुद्धा गायब झाली आहे.
चोरीस गेलेल्या वस्तूंचे वर्णन: रेडमी १४ मॉडेल मोबाईल (सिम ९०२२८५१७९२), रेडमी A3X (सिम ६३९१८६९४७६), वनप्लस नॉर्ड CE3 लाइट (सिम ९१३७३८६७९५) व ११ हजार रोख रक्कम. एकूण किंमत ५० हजार रुपये, असे फिर्यादी म्हणाले.
सलमान खान हे उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील गुलहरिया गावचे मूळ रहिवासी असून, सध्या वरवे ब्रिज येथे स्क्रॅप व्यवसाय करतात. चोरट्याने मुद्दाम लबाडीने हा मुचेमाल लंपासल्याचा संशय. फिर्यादी म्हणाले, “वस्तू मिळाल्यास लगेच ओळखू शकतो.” राजगड पोस्टेत गु.र.नं. ८१/२०२६ BNS ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल. दाखल अंमलदार सफौ काळे (९२८४८६०७६०) व पोहवा राणे (९९२३४१५३९८) तपास करीत आहेत.
पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली असून, स्थानिक व्यापारी व रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.




