ताज्या घडामोडी

राजगड साखर कारखान्यांकडून योग्य दर दिला जाईल ! शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त ऊसाची लागवड करावी : मा.आमदार संग्राम थोपटे


भोर : दि.६ (ऑक्टोंबर) सोमवारी भोर येथील अनंतराव थोपटे महावि‌द्यालयातील फार्मसी हॉलमध्ये राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्याशी कारखान्याचे चेअरमन मा.आमदार संग्रामदादा थोपटे यांनी संवाद साधत कारखाना कार्यक्षेत्रासह भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाची लागवड करावे असे आवाहन केले. पुढील गाळप हंगाम व्यवस्थितरित्या सुरु करण्यात येणार आहे तसेच यावेळी ऊस लागवडीची माहिती देण्यात आली.

भोर व राजगड तालुक्यातील युवा शेतकरी यांच्या मार्फतच ऊस बियाणे नर्सरी निर्मिती करून त्याच्या माध्यमातून ऊस बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे नवीन रोजगारही निर्माण होईल, शेतकऱ्यांना ८६,०३२ या जातीचे बेने साडे चार ते पाच फुट पट्टा पद्धतीने ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऊस बियाणे देण्यात येणार असून त्याच जातीच्या ऊस बियाण्यासाठी लागणारी खते कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना शेताच्या बांधावर पुरवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच शेत रस्ते, वीजसमस्या, सिंचन योजना, ऊसतोडणी यंत्रणा याबद्दल शेतकऱ्यांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या. यावर सकारात्मक चर्चा करून योग्य नियोजन करण्यात येणार असून विभाग निहाय अधिकारी नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी सवांद साधून माहिती देण्यात येईल, त्याचबरोबर येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील.

Advertisement

नवीन कारखान्याच्या निर्मितीमुळे प्रतिदिन ३५०० मॅट्रिक टन गाळप क्षमता, ६० के.एल.पी.डी.डिस्टीलरी प्रकल्प, १२ मेगावॅट वीज निर्मिती, ५ टन सी.एन.जी. गॅस निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्यामुळे इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दर देता येणे शक्य होणार असल्याचेही कारखान्याचे चेअरमन मा.आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने राजगड सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या ४६७ कोटी रुपये कर्जहमी बद्दल  राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष आभार मानले.

राजगड कारखाना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नव्याने सुरु होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गात उत्सहाचे व आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्याचा शेतकरी बांधवानी यावेळी विश्वास व्यक्त केला.

यावेळी कारखान्याचे संचालक उत्तमराव थोपटे, सुभाषराव कोंढाळकर, सुधीर खोपडे, प्रभारी कार्यकारी संचालक आव्हाड, मा. संचालक विठ्ठलराव कुडले, मा. कृषी अधिकारी प्रगतशील शेतकरी संपतराव थोपटे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!