क्राईम

पोलिस भरतीबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! वयोमर्यादा ओलंडणाऱ्या तरुणांना संधी


मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून पोलिस भरतीचे शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना या निर्णयामुळे पोलिस होण्याचे स्वप्न साकार करण्याची नामी संधी मिळणार आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पोलिस भरती रखडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती. अखेर भरती प्रक्रिया सुरू करणार असून वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना शासनाने संधी दिली आहे.

राज्य सरकारने सुमारे १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती जाहीर करण्यात केली आहे. दरम्यान आता यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. आता या भरतीमध्ये सन २०२२ पासून २०२५ पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे.

Advertisement

या भरती प्रक्रियेसाठी या तरुणांना अर्ज करता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय १० सप्टेंबर २०२५ रोजी गृह विभागाकडून जारी करण्यात आलाय. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या तरुणांना ही नामी संधी चालून आलीय असेच म्हणावे लागले.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतचे शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही संधी आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पोलिस भरती रखडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती. अखेर भरती प्रक्रिया सुरू झाली असून, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही शासनाने संधी दिली आहे.

पदांची नावे व संख्या पुढीलप्रमाणे

• पोलिस शिपाई – १० हजार ९०८

• पोलिस शिपाई चालक – २३४

• बॅण्डस् मॅन – २५

• सशस्त्र पोलिस शिपाई – २,३९३

• कारागृह शिपाई – ५५४

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!