क्राईम

डियर अहो. आय लव यु सो मच, यु आर अ फ्री बर्ड नाउ,चिठ्ठीत लिहीत महिला डॉक्टरची आत्महत्या


 

संभाजीनगर : I LOVE YOU… SO MACH, BYE… YOU ARE A FREE BIRD NOW… या चिठ्ठीत लिहलेल्या वाक्याने संभाजीनगर हादरले, छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील करजंखेडा येथील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 5 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या महिला डॉक्टरने (वय 26 वर्ष) गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली, पतीच्या संशयखोर स्वभावाला ती अक्षरशः कंटाळून गेली होती, त्यामुळे तिने टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव प्रतिक्षा गवारे-भुसारे असे होते.

Advertisement

प्रतीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी एक 7 पानी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. 7 पानांच्या या चिठ्ठीमध्ये पतीने तिला कशा प्रकारे मानिसक त्रास आणि छळ केला हे सांगितलं आहे. त्याने वेळोवेळी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला, तिने त्याच्याकरिता अनेक गोष्टी बदलल्या,आई-वडील असो मित्र-मैत्रिणी इतर नातेवाईकांसह सर्वांशी संबंध तोडले, तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले,बदलला, नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले.तुम्ही दिला तोच नंबर घेतला तरी ही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात. पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही,आणि नव्हते. मात्र तरीही तुंम्ही माझा छळ करण्याचे थांबले नाहीत. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आई-वडिलांना मी नसले तरी भाऊ कुणाल आहे,पण तुम्ही एकटे आहात, सासू-सासऱ्यांना नीट सांभाळा,त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका.                                             …आय लव्ह यु सो मच, बाय… यु आर अ फ्री बर्ड नाऊ…                                                         मला विसरुन आनंदाने जगा असंही प्रतीक्षा यांनी म्हटलं आहे, तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक मिठी मारूनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.             तुमचीच प्रतीक्षा…

एकंदररीत हे पत्र पाहता प्रतिक्षा गवारे-भुसारे यांची मानसिक स्थिती काय झाली असेल याचा अंदाज येऊ शकतो. इतकं सर्व करूनही आरोपी पतीचे मन भरले नाही. शेवटी तिने आपलं जीवन संपवले, पोलिसांनी आरोपी पती प्रितम गवारेवर हुंड्यासाठी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.आरोपी सध्या फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेतीलच पण आई-वडिलांना त्यांची प्रतीक्षा कधीच भेटणार नाही.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!